" पसायदान डिजिटल नेवासा " या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday, June 7, 2016

व्यवसाय करताय मग हे वाचा 

व्यवसाय करताय मग हे वाचा 

माझ्या आईने मला दोन गोष्टी सांगितल्या होत्या की, बाबा रे आयुष्यात कधी दोन कोटवाल्यांच्या नादी लागू नकोस. एक काळा कोटवाला, म्हणजे वकिलाच्या नादी लागू नको, कोर्टाची पायरी चढू नकोस. आपण धंदेवाले आहोत. डोक्यावर बर्फ तोंडात खडीसाखर ठेऊनतू बाबा मोठ्या बापाचा, जा ना बाबापण ती कोर्टाची पायरी नको. भाकरी फिरवली नाही तर ती करपते, भाकरी एका जागी कधी ठेवायची नाही. तर दुसरा कोटवाला म्हणजे डॉक्टर, तुमची तब्येत खणखणीत ठेवा, लक्षात घ्या तुम्ही बिझनेसमध्ये आहात. बिझनेसमध्ये असलेल्या लोकांनो, अरे आपल्याला आजारी पडायला परवानगी नाही रे. डॉक्टरच्या नादी कधी लागू नका याचा अर्थ तब्येत खणखणीत ठेवा.
बिझनेस करताना पुरवून पुरवून वापरण्याची प्रवृत्ती सोडा. “अंथरून पाहून पाय पसराज्या कोणी माणसाने ही म्हण तयार केली. त्याला आपण माफ् करूया, कशाला त्याच्या नादी लागायचे. अरे व्हा ना मोठे, तुम्हाला कोणी सांगितले तुम्हाला अंथरून पांघरून मिळणार नाही म्हणून.
बाबा रे मरताना डोक्यावर रुसुद्धा कर्ज नको, ही दुसरी दळीद्री म्हण कोणी निर्माण केली माहीत नाहीकर्ज नाही काढलं तर धंधा चालणार कुठनं. आज मुठभर जोंधळे पेरले तर पोतेभर धान्य येत. पोतेभर जोंधळे पेरले तर किती धान्य येईल हा साधा नियम आहे. आता मला सांगा स्वतःच्या घरातील जोंधळे आणून आणून तुम्ही किती आणणार?
मी स्वतः रोज माझ्या बायकोला सांगतो की जर माझे आडनाव कुलकर्णी नसतं आणि मी साला मराठी नसतो तर मी आज अंबानीला मागे टाकलं असतं. आपल्यातील जे मराठीपण आहे ना, मीच किती वेळा बोलतो पण मलासुद्धा अजून पूर्णपणे ओवरटेक करता येत नाही. मी पूर्णपणे मराठी नाही, अर्धा मारवाडी, अर्धा गुजराती मग उरलासुरला मराठी ब्राम्हण आहे.
मी मारवाडी लोकांचा खूप मोठा भक्त आहे. हिशोबाला ते अगदी पक्के असतात. तोंडात नेहमी खडीसाखर असते. डोक्यावर त्यांच्या नेहमी बर्फ असतो. हे लोक नेहमी फ़्लेझीबल असतात, ताईसाहेब, काकासाहेब असे मधूर बोलतात. या उलट मराठी माणूस ताठ असतो म्हणतो काय चुकले माझे बोला.
स्वतःच्या लढाया स्वतःच लढायच्या असतात, दुसऱ्यांच्या लढायांचे वर्णन ऐकताना त्याचे काय चुकले तो का पराभूत झाला, तो विजयी कसा झाला हे शोधण्यापेक्षा तो पराभूत झाला तर का पराभूत झाला, त्याच्या चुका कोणत्या हे शोधा आणि त्यातनं त्या इतिहासातून आपण आपल्या लढाया लढायच्या असतात.
आज आपण भारतासारख्या देशात आहोतएका बाजूने आतिशय भ्रष्ट आचरणाने देश रसातळाला चालला आहे. असे असताना त्याच वेळेला आपल्याकडे दुसरी ताकद म्हणजे जगातील सर्वात तरुण लोकसंख्या ही जगात कोठेही नाही ती भारतात आहे. जगातले सर्वात जास्त तरुण आज भारतात आहेत. जगात सर्वाधिक इंग्रजी बोलणारे आपल्या देशात आहेत ह्या काही आपल्या भक्कम बाजू आहेत, त्यामुळे बिझनेस करणाऱ्याला काही मरण नाही.
बिझनेसमध्ये तुम्हाला तुमचा कस्टमर ओळखता आला पाहिजे, तुम्हाला तुमचे आयुष्य ओळखता यायला पाहिजे आणि त्याला अनुसरून बिझनेस करता यायला पाहिजे. नेहमी आपल्या कस्टमरचा अभ्यास करा. मित्रांनो लक्षात घ्या, तुमचा कोणताही बिझनेस असू द्या जर तुमचे ऑफिस असेल तर ते नेहमी स्वच्छ क्लीन नीटनेटके ठेवा यावरसुद्धा तुमच्या बिझनेसचे यश अवलंबून असत.
धंद्यामध्ये मार्केटिंग खूप महत्त्वाचे. धंद्यामधे विकणारा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. जर तुम्हाला व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर तर काहीना काही तरी विकायची पहिल्यापासून सवय ठेवा. विनोदाचा भाग सोडून द्या, पण तुम्हाला टकलू माणसालासुद्धा कंगवा विकता आला पाहिजे. काहीना काही विकण्याचा आत्मविश्वास निर्माण करा मग तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता.
व्यवसायात प्रेझेंटेशनसुद्धा खूप महत्त्वाचे. सुरवातीच्या काळात मला किर्लोसकरांनी १०० रु दिले होते, चांगले कपडे, बूट टाय घेण्यासाठी. तेव्हापासून मित्रांनो ही टाय जी माझ्या गळाल्या लागली आहे ती अजूनही आहे. मी नेहमी कुठेही जाताना व्यवस्तिथ नीटनेटके कपडे घालून जातो. तुमचा पेहरावा असा असला पाहिजे की तुम्ही समोरच्याला आपलेसे वाटले पाहिजे. तुमचे व्यक्तिमत्व इतके स्वच्छ पाहिजे की तुमच्या वागण्या-बोलण्यातून लोकांना तुमच्याबद्दल विश्वास निर्माण झाला पाहिजे.
Description: d-s-kulkarniमित्रांनो, विहिरीत, ओढ्यात, स्विमिंग पूल/डबक्यात किती दिवस पोहायचे? नदीकडे आपण जायला हवे पुढे समुद्राचे ध्येय ठेवले पाहिजे. रोज तुम्हाला बिझनेसला पैसे कमी पडत असतील तर समजा तुम्ही प्रगती करत आहात आणि जर तुमचे पैसे उरत असतील लक्षात ठेवा तुम्ही धोक्याच्या दिशेने जात आहात. तुमचा बिझनेस दरवर्षी १० टक्क्यांनी तरी वाढलाच पाहिजे, तुमची वाढ झालीच पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, असा किंवा तसा तुमचा बेसिक Infrastructure cost दरवर्षी वाढणारच आहे. मग तुमच्या वाढीचा दरही वाढलाच पाहिजे आणि यासाठी तुम्हाला कर्ज घेतलेच पाहिजे. तुम्हाला तुमच्या कर्जाचा अभिमान वाटला पाहिजे. मला आज अभिमान आहे की माझ्यावर ७०० कोटींचे कर्ज आहे. या कर्ज देणाऱ्या एकूण १४ बँका आहेत त्यातील अमेरिकन बँक आहेत.
आता ही पत कशी वाढवायची? जर समजा तुमचा एक व्यवसाय आहे त्यातून तुम्हाला १०० रु मिळाले तर ते सर्व नेऊन प्रथम बँकेत भरायचे. आता तुम्हाला तुमच्या व्यवसायचा माल आणण्यासाठी २० रु लागत आहेत, तर ते आता तुमच्या बँकेतील १०० रुपयांमधून २० रु काढा. जेवढे तुमचे बँकेत पैसा जातो तेवढा तो तुमचा टर्नओवर मानला जातो. तुम्ही किती पैसा काढता यापेक्षा किती भरता याला महत्त्व आहे.
मित्रांनो पेला अर्धा भरला आहे की पूर्ण, हे पाहत बसू नका. तर जे काही आहे, ते देवाने तुम्हाला खूप काही दिले आहे असा विचार करून आयुष्य पुढे न्या. काय गेले आहे त्यापेक्षा काय आले आहे याकडे पाहा. माझी ज्यावेळी पेपरची लाईन होती त्यावेळी म्यॅट्रीकचा निकाल पेपरमधून यायचा. दुपारी जीवाच्या आकांताने ते पेपर आपल्या हातात घ्यायचे सायकलवर टाकूनआला आहे एस.एस.सी. रिझल्टअशी आरोळी मारत ते पेपर विकायचे. १० मिनिटांमध्ये लोक जास्त पैसे देऊन विकत घ्यायचे ते पेपर पटकन संपायचे. सगळे अंक १० मिनिटांमध्ये संपून माझ्याकडे एक मोठी चिल्लर जमा व्हायची. ४० रु. डाव्या खिशात ४० रु. उजव्या खिशात टाकून मी रुबाबात चालायाचो. ते ८० रुपयांचे जे सुख आहे ते आज मला ,००० कोटी रुपयांत मिळत नाही. सुख नेमके कशात मानायचे ते मित्रांनो लक्षात घ्या. तुम्हाला समाधान कशात मानायचे हे कळले ना मग पुढे कुठेही त्रास होत नाही.
मित्रांनो तुम्हा आम्हा सर्वांकडे एक मोठी गोष्ट आहे, एक मोठी ताकद आहे ती म्हणजे विश्वासाहर्ता. मराठी माणसाचा विश्वासाहर्ता हा मोठा गुण आहे, हाच मोठा आपला ब्रान्ड आहे. लोक इतर काहीही म्हणतील की त्याला धंधा करायला येत नाही, त्याच्याकडे व्यवसायाची समज कमी आहे. हा पण तो मराठी माणूस आहे तो चोर नाही. अरे हा मराठी माणूस आहे याच्याकडून वस्तू विकत घ्यायला हवी कारण हा कधी फसवणार नाही. मग तुमच्याकडे जर हा इतका मोठा प्लस पॉईन्ट आहे तर तो इनक्याश करा. इथे जरूर गर्वाने बोल की आम्ही मराठी आहोत.
सुरुवातीला अनेक छोटे छोटे व्यवसाय करताना मला या अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. लहानपणी भाजी विकताना ग्राहक जेव्हा भाजी घ्यायला यायचे तेव्हा माझ्या काकांना सांगायचे की त्या लहान मुलाच्या (म्हणजे माझ्या) हातात तराजू द्या, कारण तो कधीही काटा मारत नाही. तुमच्या तराजूचा काटा हा नेहमी ग्राहकाच्या बाजूनेच झुकलेला असायला हवा.
मी आलेली संधी कधीच सोडत नाही, असे करताना चुका होतात. पण मी त्या दुरुस्त करतो त्यातून मार्ग काढतो. त्यावेळी पुण्यात जंगली महाराज रोडवर बांधकाम करताना अनेक नियमांमुळे बहुतेक सर्व बांधकाम अनधिकृत होत होते. मग ते महापालिका येऊन पाडायचे. मग मी जिद्दीने ठरवले की आपण सर्व नियमांत बसवून हॉटेल बांधायचे. मी प्रयत्न केले सर्व अधिकृत परवानग्या घेऊन बांधकाम केले. त्यात माझे खूप नुकसान झाले, माझी खूप जागा वाया गेली. पण मी म्हटले हरायचे नाही, जिद्द सोडायची नाही. हॉटेल बांधून तयार झाले, पण वर्षभर जास्त कस्टमर आलेच नाही. मग मला कमी किमतीत जागा विकण्याचे ऑफर येऊ लागले, काहींनी तर मला वेड्यात काढले. कारण त्यांना लक्षात आले की याच्याकडे कोणीच येत नाही.
मग मी विचार करू लागलो काय करायचे? मग मी स्वतःच रेस्टोरंन्ट चालू करायचे ठरवले. म्हटले डोसा इडली नाही तर मोठे स्वप्न पाहायचे. मग मी सरळ अमेरिके McDonald मध्ये संपर्क केला. त्यांचे अनेक वेळेला नकार आला, पण मी सोडलेच नाही शेवटपर्यंत. त्यावेळी मला कोणी तरी तरी सुचवले की तू कार  शो रूमचा का विचार करत नाहीस. ज्याने सुचवले त्याचे स्वतःचे कार शो रूम मी पहिले आणि माझे डोळे चकाकले. तिथून उठलो थेट टोयाटोचे पुण्यातील हेड ऑफिस गाठले आणि टोयाटोची डीलरशीप घेऊन आलो. साहेब वडापाव आणायला गेलो आणि टोयाटो घेऊन आलो. McDonald म्हणजे दोन पावाच्या आत वडा असतो, म्हणजे तो काय वेगळा असतो का? तो वडापावच हो. अशाप्रकारे संधी कुठे लपलेली ते असते सांगता येत नाही.
तुमच्या कस्टमरला तुमचे ऑफिस त्याचे वाटायला हवे. तुमच्या कस्टमरला तुमच्या टेबलावर येऊन हात आपटून भांडण्याची मुभा असायला हवी, असे खरच करून बघा तुम्ही आयुष्यात नेहमी यशस्वी आणि यशस्वीच होत जाल. माझ्या ऑफिसमध्ये जेव्हा कोणी फोन करतात तेव्हा त्याला गाणेसुद्धा आनंद देणारे असेल याचीदेखील आम्ही काळजी घेतो. इतक्या बारीक बारीक गोष्टी पाहा, तुमच्या कस्टमरला जिंका.
दुसरे मित्रांनो भाषेवाचून काही अडत नाही हे लक्षात घ्या. माझे स्वतःचे इंग्रजीमुळे काहीच अडले नाही. बिझनेसमध्ये जेव्हा तुम्ही पडता तेव्हा भाषेमुळे काहीच अडत नाही. मी खूप देशात फिरतो चीन, जपान, फ्रान्स यासारख्या देशात, तेथील लोकांशी बोलतो भेटतो माझे कशामुळे काहीच अडले नाही. जेव्हा जेव्हा अडचणी येतात ना तेव्हा तेव्हाच मुळात आपल्याला मार्ग सुचतात. तुमच्यात आत्मविश्वास पाहिजे. भिडून जाण्याची तयारी पाहिजे. हृदयापासून बोला तीच आपली मातृभाषा असते, त्यावेळी तुमचे डोळे बोलतात, हृदयापासून जे येते तेच कनेक्ट होते. तरुणांनो मला सांगा प्रथम पोरगी पटवताना तुम्ही डोळे मारूनच तुमच्या भावना तिला सांगता ना? तिथेसुद्धा जे हृदयातून येते तेच कनेक्ट होते. डोळ्याच्या भावना, प्रेमाच्या भावना, हृदययाच्या भावना ही बॉडीलँग्वेज आहे.
एकदा दुबईला जाताना मी विमानाने जात होतो, विमानात जाताना कोणी माझा कस्टमर नसतो म्हणून विमानाने बिझनेस क्लासमधून दुबईला जात होतो. त्या बिझनेस क्लासमध्ये तुमच्या सीट समोर टीव्ही असतात. एक हिंदी सिनेमा त्यावर लागला होता मी तो टाईमपास म्हणून पाहत होतो. शेजारी माझ्या एक फ्रेंच माणूस बसला होता तो माझ्याकडे पाहत इंग्रजीत त्याने मला विचारलेहा जो सिनेमा आहे त्यातील ही नटी कोण आहे? तुम्ही तिला ओळखता का? मी म्हटले मी हिला ओळखत नाही पण एका नटीला ओळखतो ती म्हणजे माधुरी दीक्षित. ती माझी पार्टनर होती ११ वर्ष ती माझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टरवर होती. आणि तो एकदम उभा राहिला माझा हात हातात घेतला. अहो मी तिला आताच तर भेटण्याचा प्रयत्न करून आलो आहे. पण तिच्या सेक्रटरीने मला भेटूच दिले नाही. मी विचारलेका असे घडले. तो इंग्रजीत म्हणाला, अहो मी फ्रेंच परफ्युमचा उत्पादक आहे आणि मला ती ब्रान्डींगसाठी हवी आहे. पण तिच्याशी मला कोणी भेटून दिले नाही.
अशा वेळेला तुम्हाला संधी ओळखता यायला पाहिजे ती साधता यायला पाहिजे. मी त्याला म्हटले मी तिच्याशी तुझी भेट घालून देईन, मला कमिशन नको तुझ्या व्यवसायात भागीदारी दे. अशी संधी जेव्हा येते तेव्हा मोठ्या गोष्टी यातून काय घडतील ते पाहा, मोठ्या स्वप्नांकडे पाहा. खरेतर ही खूप छोटीशी गोष्ट आहे ओळख करून देणे, पण त्यात संधी मी ओळखली. अशाप्रकारे मी आयुष्यात अनेक संधी साधल्या.
आणखी एक गोष्ट सांगतो मी वर्ल्ड इकोनॉमीचा मेंबर आहे, दर तीन महिन्यांनी कुठल्या ना कुठल्या राष्ट्रामध्ये त्या त्या शहरात कॉन्फरन्स भरतात. आपल्या भारतातही अनेकदा या मिटिंग होतात. यावेळी सगळ्या जगातील इंडस्ट्रीयल तिथे येतात, तेव्हा तिथे त्या राष्ट्रातील पंतप्रधान, तेथील नेते सर्वांना त्यांच्या राष्ट्रातील संधी सांगतात सर्वांना आवाहन करतात गुतंवणूक करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी. जेणेकरून त्यांच्या देशातील रोजगार वाढेल, देशात पैसे येतील.
एकदा आफ्रिकेत डरबनमध्ये ही कॉन्फरन्स होती तिथे मी गेलो होतो. राउंड टेबल कॉन्फरन्स भरली होती आणि प्रत्येक जण काहीना काही स्पीच देत होते. माझी वेळ आली आणि का कोण जाणे मी काहीबाही बोलून गेलो, मी उठलो आणि म्हणालो इंग्रजीतआदरणीय पंतप्रधान मी तुमच्या देशातील गरीब लोकांसाठी दहा हजार घरे फुकट बांधून देईन.” सर्वजण अचंबित होऊन माझ्याकडे बघायलाच लागले.
क्षणभर कोणीच टाळ्या नाही वाजवल्या, पण हळू हळू लक्षात आल्यानंतर एक एक जण टाळ्या वाजवू लागला. नंतर मला माझी चूक लक्षात आले की, आपण हे काय बोलून बसलो आहे. मला आपल्या मुंबई-पुण्याची सवय, जर मी दहा हजार झोपड्या फुकट बांधून दिल्या तर मला दहा Tower फुकट बांधायला मिळतात पुण्यात. मला तितका एफ.एस.आय. मिळतो, माझ्यातील बिल्डर जागा झाला. त्यांनी संध्याकाळी वेगळे बोलवून घेतले. मी त्यांना म्हणालो, कि ही डील डन झाली आहे. मी माझा शब्द खरा करून दाखवणार, मी दहा हजार घर फुकट बांधून देईन. फक्त निट समजून घ्या मी एक भारतीय माणूस आहे, मी काही चुकीचे बोलत नाही आहे. मी जे भारतात करू शकतो ते इथे ही करू शकतो.
त्यांनी विचारले काय आहे ही ऑपेरेशनल प्रोसेस. त्यांना मी सांगितले की, जर मी दहा हजार झोपड्या फुकट बांधून दिल्या तर मला दहा Tower फुकट बांधायला मिळतात, मला तितका एफ.एस.आय. मिळतो आणि ते विकून मी पैसे मिळवतो. मग त्यांनी सांगितले की ओके मग तुम्ही इथे माझ्या देशात घरं बांधा आणि विका. पण मी म्हटले इकडे तुमच्या देशात घरं बांधली तर ती विकत कोण घेणार. सर तुमचा देश नुकताच स्वतंत्र झाला आहे, तुमचा प्रॉब्लेम जो आहे ते म्हणजे घर, मी ते दहा हजार घर तुम्हाला फुकट बांधून देईन, पण त्या बदल्यात तुम्ही मला काय देणार? मी कधी नाही म्हणालो, असे म्हणत मी आपली चूक दुरुस्त करायला लागलो. मग त्यांची आपआपसात चर्चा खलबत सुरु झाली, यात एक तास गेला. “येस, आम्ही तुम्हाला काहीतरी द्यायला तयार आहोत.” मी विचारले काय? आम्ही तुम्हाला २५ वर्षांच्या कराराने खाण चालवायला देत आहोत.” दगडाची नाही मित्रांनो सोन्याची. कुठल्या कुठे गोष्ट गेली. ही ऑफर दुर्देवाने मला पुढे घेता आली नाही कारण त्यावेळी त्या देशात कायदा सुव्यवस्था परिस्थिती खराब होती.
पण यातून मला तुम्हाला काय सांगायचे आहे की तुम्ही हृदयापासून बोला नक्की काही ना काही घडणारच. संधी, प्रोब्लेम, आयुष्य हे असे काहीना काहीतरीच चालूच असणार यातूनच आपल्याला मार्ग काढत पुढे जायचे असते.
आयुष्य आपल्या रानातल्या झऱ्यासारखे आहे. रानातला झरा वाहतो कसा ते पाहा, तो नागमोडी वाहतो. आयुष्यसुद्धा सरळ असूच शकत नाही, ते नागमोडीच असणार हे स्वीकारा. आयुष्य नागमोडी आहे म्हणूनच ते जीवन छान असते. रानातला झरा वाहतो तेव्हा तो काट्याकुट्यातून वाहत असतो. आपल्याही आयुष्यात काटे हे लागणारच, पुढे दगड धोंडे लागतात. रानातला झरा दगड-धोंड्यातून वाहतान ठेचकाळत नाही तर सुंदर आवाज करत वाट काढून पुढे निघून जातो. पुढे मोठा धोंडा असतो पण तिथे तो थांबत नाही, पाणी एका जागी थांबले तर डबके होते. ते पाणी त्या मोठ्या धोंड्यापाशी थांबत नाही, वाट काढून पुढे निघून जाते. कारण त्याचे ध्येय असते पुढे जाऊन समुद्राला मिळायचे.
आपल्या आयुष्यातसुद्धा असेच असते, आपल्या वाटेत दगड धोंडे, काटेकुटे असतील पण कुठेच थांबू नका, वाट काढून पुढे निघून जा. हा रानातला झरा त्याचा मार्ग तो स्वतःच शोधून काढतो कुणाची मदत घेत नाही. आपण व्यवसायवाले आहोत, आपला मार्ग आपणच काढायचा असतो. आपले संकटे आपणच दूर करायची आहेत, मुळात संकटाना संकट मानायचे नसते. असे आयुष्य ठेवा बघा यश दोन्ही हात जोडून तुमच्यासमोर येईल आणि यश तुम्हाला नकार देणार नाही.