या योजनेचा फायदा घ्या आणि दरमहा ३० हजार कमवा
जर आपण नोकरी शोधत असाल तर सरकारद्वारे सुरू असलेल्या या योजनेबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. तुम्ही या योजनांचा फायदा घेऊन चांगली कमाई करु शकता. गाव, शहर किंवा कोणत्याही ठिकाणाहून तुम्ही हा व्यवसाय करुन दरमहा ३० हजार रुपये कमावू शकता.
वी दिल्ली: जर आपण नोकरी शोधत असाल तर सरकारद्वारे सुरू असलेल्या या योजनेबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. तुम्ही या योजनांचा फायदा घेऊन चांगली कमाई करु शकता. गाव, शहर किंवा कोणत्याही ठिकाणाहून तुम्ही हा व्यवसाय करुन दरमहा ३० हजार रुपये कमावू शकता.
शुल्क आणि प्रक्रिया शुल्क नाही
नवीन बदलानुसार, सरकारने पंतप्रधान भारतीय जनऔषधी केंद्रांसाठी लागणारा शुल्क आणि प्रोसेसिंग घेणे थांबविले आहे. तसेच मेडिकल स्टोअर्स उघडू इच्छिणाऱ्यास २.५ लाखाची मदत केली जाणार आहे. त्यामूळे तुम्हाला कोणतीही गुंतवणूक करण्याची गरज नसणार आहे.
२० हजारांहून अधिक केंद्र
संपूर्ण देशभरात पंतप्रधान जनऔषधी केंद्रामार्फत लोकांना स्वस्त औषधे देण्याचे प्रयोजन आहे. गेल्या काही दिवसात २० हजाराहून अधिक जनऔषधी केंद्र उघडली आहेत. तुम्ही ३० हजाराहून अधिक रक्कम यातून कमावू शकता.
तुम्हीही उघडू शकता केंद्र
जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी सरकारने काही नियम, अटी ठेवल्या आहेत. या अंतर्गत ३ श्रेणी आहेत. पहिल्या श्रेणी अंतर्गत कोणीही फार्मासिस्ट, डॉक्टर किंवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी असलेला बेरोजगार एक स्टोअर उघडू शकतो. दुसऱ्या श्रेणीत ट्रस्ट, एनजीओ, प्रायव्हेट हॉस्पिटल, सोसायटी आणि सेल्फ हेल्प ग्रुप तर तिसऱ्या श्रेणी अंतर्गत राज्य सरकारकडून नॉमिनेटेड केलेली एजन्सी हे केंद्र उघडू शकते.
किती लागणार जागा?
जनऔषधी केंद्रासाठी कमीत कमी १२० स्क्वेअर फूट एवढी जागा लागणार आहे. जर सरकारने परवानगी दिली तर ६५० पेक्षा जास्त औषधांसोबत १०० हून जास्त उपकरणेही विक्रीस उपलब्ध केली जाणार आहेत.
२.५ लाख मदत मिळवा
सार्वजनिक केंद्र उघडण्यासाठी सुमारे २.५ लाख रुपये खर्च केले जातात. जे लोक सार्वजनिक आरोग्य केंद्रे उघडतात त्यांना २.५ लाख रुपये सरकारी मदत दिली जाईल. याचा अर्थ आपल्याला या योजनेअंतर्गत वैद्यकीय स्टोअर उघडण्यासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे गुंतवावे लागणार नाहीत.
असे मिळेल उत्पन्न
जनऔषधी केंद्रास परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही जेवढ्या किंमतीची औषधे विकाल त्याच्या २० टक्के रक्कम कमिशन स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही १ लाखाची औषधे विकलात तर २० हजाराचे कमिशन आणि इंसेटिव्ह मिळून ३० हजार रुपयांची कमाई होऊ शकते. जर तुम्ही जास्त औषधांची विक्री केलात तर जास्त कमाई करु शकता.