" पसायदान डिजिटल नेवासा " या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Sunday, May 2, 2021


 



पार्ट १


कोरोना महामारीचा प्रादुर्भाव  एकीकडे वाढत आहे

हॉस्पिटल मध्ये कोरोनाचा  उपचार घेण्यासाठी खूप पॆसे मोजावे लागतात

 हॉस्पिटल चे भरमसाठ बिल भरावे लागत आहे सर्वाना विनंती आहे कुटुंबाची कोरोना पोलिसी करून घ्या हॉस्पिटलच्या भरमसाठ बिला पासून आपनास  सुटकारा मिळेल 




अश्या मध्ये सरकराने लॉक डाउन  जाहीर केले 


या मध्ये लहान व्यासायिकाचे शेतकरी बांधवांचे  प्रचंड अर्थीक हानी नुकसान होतंय ... ....

काही बांधवांचे नोकरी गेली....,   आता नवीन व्यवसाय करायचा  ... .पण या सर्वांपुढे संकट उभे राहते ते आर्थिक / भांडवल आणि शेतकरी बांधवाकडे शेती करण्यासाठी  यंत्र सामग्री खरेदी  साठी पुरेशा पैसे  नसल्यामुळे तो चांगली शेती करू शकत नाही 

या सर्वासाठी  पुरेशे पैसे नसतात  ......... आपण इकडे तिकडे उधार मागून पाहतो तर कुणीच वेळेवर  पैसे देत नाही...... अश्या वेळेस आपणाकडे कोणता एकाच  पर्याय असतो   तो म्हणजे 

बँक लोन  


पण बॅक म्हंटले कि लोन चे हफ्ते ......,,त्याचे व्याज   असे  पैसे भरावे लागतात पण असे नाही का होणार फक्त हफ्ते चे पैसे जातील  आणि व्याज माफ होईल किव्हा त्याचा व्याज परतावा मिळेले   हो ?? असे होऊ शकते ????


नमस्कार मंडळी  मी अनिल घोलप  आज आपण आज अश्या विविध योजना माहिती आपल्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत हा  व्हिडीओ आपले सर्व  शेतकरी बांधव , व्यासायिक  सर्वासाठी खूप खूप उपयुक्त आहे मराठा शेतकरी मराठा  समाजातील तरुण तरुणी  एकीकडे त्याचे आरक्षण रद्द झाले  असे युवा व्यासासायिक म्हणून किव्हा उदयोजक म्हणून त्याचे  भविष्य घडू शकतात तर जाणून घेऊ काय आहे या दोन  योजना 


पार्ट २ 

---------------------------------------------------------------------------------

आण्णा साहेब पाटील महामंडळ योजना व राज्य सरकार महा डीबीटी  योजने अंतर्गत शेतकरी बांधव ट्रॅक्टर लोन फायदा कसा मिळू शकतो आज आपण या दोन योजना विषयी अधिक माहिती घेऊ 

जे  शेतकरी बांधव शेती करतात त्यांना मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर गरज असते पण ट्रॅक्टर किंमत खूप असल्या कारणाने बरेच शेतकरी बांधव ट्रॅक्टर घेत नाहीत पण आज आपण अश्या दोन योजना माहिती घेणार आहोत त्या योजनेत शेतकरी बांधव ट्रॅक्टर घेणे अगदी सोपे आहे या योजना शेतकरी बांधव साठी वरदान ठरणार आहेत 


या दोन्ही योजने विषयी 


1) अण्णा साहेब पाटील महामंडळ कर्ज परतवा योजना

2) कृषी यांत्रिकीकरण अनुदान  योजना 

थोडक्यात आपण अगोदर एक एक करून दोन्ही योजना समजाऊन घेऊ 

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना दिनांक २७/११/१९९८ रोजी केलेली आहे.

राज्यात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाचा आर्थिक विकास करणे आवश्यक आहे. त्याकरिता विशेष करून या घटकातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता राज्यशासनाने दिनांक २९ ऑगस्ट १९९८ रोजी निर्णय घेतला व या निर्णयास अनुसरून राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सुरु करून त्यामार्फत स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबतची माहिती, मार्गदर्शन, व आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे.



आताWeb:http://mahaswayamrojgar.maharashtra.gov.in./Forms/JobScheme.aspx या वेबसाईटवरुन आपणास ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्याचा लाभ घ्यावा सदर वेबसाईटवर योजना या ऑपशनमध्ये आपणास कर्ज प्रकरणासाठी आवश्यक ती सर्व माहिती उपलब्ध आहे. तसेच माहिती पूर्ण तयार केल्यानंतर आपण वरील वेबसाईट वरुन ऑनलाईन अर्ज सादर करु शकता. त्या करिता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयात यावयाची आवश्यकता नाही किंवा कार्यालयाकडून अर्ज घ्यावयाची आवश्यकता नाही


अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज परतवा योजना म्हणजे काय आणि यात फायदा काय आहे 

ही योजना वय वर्ष 18 ते 50या वयोगटातील असणाऱ्या शेतकरी बांधवाना लागू आहे तो  शेतकरी हिंदू मराठा जातप्रवर्गा तील असावा 

आण्णासाहेब पाटील महामंडळ पात्रता काय आहे खालील link  पीडीएफ डाऊनलोड करू शकता 

https://drive.google.com/file/d/1RNKfnbhuileSel6ZUMYUWMV5xjUFN_4A/view?usp=sharing

 सगळ्यात आधी योजना समजाऊन घेऊ 

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ही योजना व्याज परतवा योजना आहे

उदा. समजा आपण एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले तर बँक आपल्याकडून कर्ज व त्याचे व्याज पण घेते पण आपण जर या योजनेतून अर्ज केला असेल तर आपणास पूर्ण कर्जावर जे व्याज आहे त्याचा संपूर्ण परतवा मिळणार आहे 

आपण जर 10 लाख बँक कडून लोन घेतले तर आपणास त्या 10 लाखवर जे कर्ज हफ्ते असतील ते हफ्ते व त्यावरील व्याज बँक आपल्याकडून अगोदर घेणार आहे नंतर आपणास महामंडळ कडे जाऊन बँक खाते तपशील दाखून हफ्ते वरील जे व्याज असेल ते व्याज महामंडळ आपल्या खात्यात जमा करेल  ही सर्व प्रोसेस ऑनलाईन सुद्धा आहे 


किती रक्कमेवर व्याज परतवा मिळतो 50 हजार ते 10 लाख रु कर्जावर व्याज परतवा मिळेल 

त्यासाठी फार सोपी कागदपत्र लागतात या योजनांसाठी पसायदान डिजिटल  यूट्यूब वर एक व्हिडिओ आहे तो संपूर्ण व्हिडिओ प…

शेतकरी बांधवच नाही तर इतर तरुण तरुणी  मराठा बांधव यांना  व्यवसाय करण्यासाठी अर्ज करू शकतात  महामंडळ ची  लोन मर्यादा 10 लाख पर्यंत आहे 


योजना 

कृषी यांत्रिकीकरण योजना


या योजनेत शेतकरी बांधव ट्रॅक्टर   व ट्रॅक्टर अवजारे अनुदान योजना साठी अर्ज करू शकतात 

1 ते 1.25 लाख पर्यंत अनुदान मिळू शकते 

ही योजना अनुदान साठी ऑनलाईन अर्ज सुरू आहे शेतकरी बांधव ऑनलाईन अर्ज करून योजनाचा लाभ घेऊ शकतात

 आता शेतकरी फायदा कसा होईल हे पाहू 


सर्वात अगोदर शेतकरी बांधवांनी महाडीबिटी पोर्टल वर अर्ज करावेत अर्ज मंजूर झाल्यावर त्या शेतकरी बांधवास एसएमएस माहिती कळविण्यात येते 

त्यानंतर शेतकरी बांधवांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज परतवा योजना साठी अर्ज करावा बँक लोन मंजूर करून महामंडळाची सर्व प्रोसेस करून ट्रॅक्टर खरेदी करावा 

1) अण्णासाहेब पाटील मध्ये लोन वरील व्याज परतवा मिळेल

2) कृषी यांत्रिकीकरण मध्ये १ते १.२५ लाख अनुदान मिळेल

शेतकरी बांधवांनी फक्त ट्रॅक्टर साठी नव्हे तर ट्रॅक्टर यंत्रे , दुग्धव्यवसाय , शेळीपालन , कुकुटपालन,  शेती जोड धंदा , इ साठी महामंडळ कर्जावरील व्याज परतवा करते 










Tuesday, September 29, 2020

कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान

कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान

योजनेबद्दल


विभागाचे नाव

कृषी विभाग


सारांश

    कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे.

    उद्देश :
    जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे.
    प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे.

    धोरण :
    कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे

अनुदान

    या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल:


    १) ट्रॅक्टर
    २) पॉवर टिलर
    ३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
  • ४) बैल चलित यंत्र/अवजारे
    ५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे
    ६) प्रक्रिया संच
    ७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
    ८) फलोत्पादन यंत्र/अवजारे
    ९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
    १०) स्वयं चलित यंत्रे

    भाडे तत्वावरील सुविधा केंद्र:


    १) कृषि अवजारे बँकेची स्थापना
    २) उच्च तंत्रज्ञान , उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना

      पाहावे.



पात्रता

  •  शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
  •  शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
  •  शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
  •  फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
  •  कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
  •  एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल
  • उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील

आवश्यक कागदपत्रे

  •  आधार कार्ड
  •  ७/१२ उतारा
  •  ८ अ दाखला
  •  खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
  •  जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
  •  स्वयं घोषणापत्र
  •  पूर्वसंमती पत्र



 

Thursday, June 11, 2020

अहमदनगर जिल्हा पीक कर्ज फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा how to fill crop loan online form

अहमदनगर जिल्हा पीक कर्ज फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा how to fill crop loan online form

अहमदनगर जिल्हा पीक कर्ज फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा how to fill crop loan online form



Website link


https://ahmednagar.nic.in/notice/application-for-crop-loan-2020-21-ahmednagar-district/

अहमदनगर जिल्हा पिक कर्ज योजना ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाले आहेत ...

शेतकरी बांधव घरच्या घरी आपल्या मोबाईल वर अगदी सहज हा फॉर्म भरु शकता

पसायदान डिजिटल ऑनलाईन सेवा नेवासा

पिक कर्ज अर्ज कसा करायचा अगोदर आमचा व्हिडिओ संपूर्ण बघा ...

लिंक - https://youtu.be/_q5VOqYwd9Y

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी

लिंक - https://ahmednagar.nic.in/notice/application-for-crop-loan-2020-21-ahmednagar-district/

सौजन्य - पसायदान डिजिटल

अण्णासाहेब पाटील महा मंडळ योजना फॉर्म माहिती - https://youtu.be/8AllyIFQWOE

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती MSME CM EGP - https://youtu.be/howtWmuL7DU

किसन क्रेडिट कार्ड माहिती - https://youtu.be/-ufLSNcXm0U

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना -
https://youtu.be/iAtBJDCmpmk

कुसुम सोलर योजना -https://youtu.be/dUWdm_LIP4M

सर्वांना विनंती आहे आपले चॅनल हे योजना आणि अनुदान याची माहिती देणारे चॅनल आहे
जर तुम्हाला योजना माहिती हवी असेल तर चॅनल ला सा सबस्क्राईब करा

ही माहिती सर्व शेतकरी बांधव व तुमच्या ग्रुप वर पाठवा

Friday, April 10, 2020

शालेय वर्ग २०२०  इयत्ता  १ ली  ते १२ वि 
 सर्व पुस्तके आपल्या मोबईल कॉम्पुटर मध्ये डाऊनलोड करा 
खालील लिंक वर जाऊन सर्व पुस्तके वाचा डाऊनलोड करा अगदी मोफत
http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx




http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx








Thursday, March 8, 2018

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना दिनांक २७/११/१९९८ रोजी केलेली आहे.

उद्दीष्टे

  • आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांनपर्यत पोहचून त्यांना सक्षम बनविणे.
  • योजना राबवून रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
  • आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे.

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान

मार्गदर्शक सूचना