" पसायदान डिजिटल नेवासा " या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday, January 1, 2016

                    मी कोणता व्यवसाय करू ?
(व्यवसाय कसा सुरू करावा ? - 3)
3) व्यवसायाची निवड : - औद्योगिक व आर्थिक वातावरणाच्या पार्श्र्वभूमिवर व धंद्याचा विचार करुन आपण आपला धंदा निवडावा.तत्पूर्वी आपण करणार असणाऱ्या धंद्याचे मार्केट कसे राहिल याचा सर्वे करावा.येथे मला आपणाला सुप्रसिद्ध ‘ बाटा ’ कंपनीने अगदी स्वातंत्र्यपूर्व काळात केलेला मार्केट सर्व्हे आठवतो.ही कंपनी तशी विदेशी.त्यांनी कामगार कमी पगारावर मिळतील म्हणून आपली कारखानदारी कलकत्ता येथे निवडली.त्यानंतर त्यांनी ज्यांना विशेष ट्रेनिंग दिलेले होते ते लोक भारतभर शहरात आणि खेड्यात ही रस्त्यावर आणि बाजारात गेले. येथील नागरिक कोणती चपला किंवा बूट वापरतात यांचा सखोल अभ्यास केला.लोकांना टिकावू चपला किंवा बूट हवे असतात.त्यांनी त्यात ते सर्व ठेवले परंतु त्याचबरोबर त्यांनी आकर्षकपणा आणला.विविध लोकांच्या पायांची मापे त्यांनी उपलब्ध करून दिली.आजही बाटा या क्षेत्रात सगळ्यांचे बाप आहेत ते उगाच नाही.म्हणून ग्राहकांचा कोणत्या गोष्टींचा प्रतिसाद मिळेल ते लक्षात घेऊन पुढील वाटचाल करावी.
4) धंद्याचे स्वरुप : - व्यवसायाचे स्वरुप कसे असावे ,त्याची रचना कोणत्या प्रकारे करावी ,व्यवसाय एकट्यानेच करावा का इतर कुणी भागिदार असतील याचा विचार काळजीपूर्वक करावा.आम्हां मराठी माणसांना भागिदारी कधीच लाभत नाही असा प्रवाद आहे.याचे कारण सुरुवातीचे दिवस सोडल्यानंतर ही मालमत्ता आपली एकट्याची नाही ही भावना आपल्यात नसते.नंतर नंतर तर मिळेल ते लंपास करण्याची प्रवृत्ती निर्माण होते.धंदा डबघाईला येतो.व त्याचे बारा वाजतात.
म्हणून भागिदारीत व्यवसाय सुरू करताना हे सर्व व्यवहार वकिलांमार्फत कागदोपत्री झालेले असावेत.कुणाचा सहभाग किती असेल ते नक्की करुन घ्यावेत.अगदी एका रुपयांपासून कितीही मोठे व्यवहार असू द्या ते लेखी झालेच पाहिजेत असे ठरवावे.म्हणजे एकमेकांवर अविश्र्वास ठेवण्याचा प्रश्र्नच येत नाही.या बाबतीत मी मारवाडी लोकांचा आदर्श ठेवण्याची सूचना करतो.समजा त्यांचा धंदा पुण्यात असेल तर त्यांचा एक पार्टनर कधी कोईमतूरचा असेल तर दुसरा पाटण्याचा असेल तर तिसरा कुठल्यातरी राजस्थानातील असतो.यांचे सर्व खरेदी विक्रीचे व्यवहार लेखीच होतात.पैसे काढणे किंवा भरणे हे असे व्यवहार केवळ चेकनेच होतात.त्यामुळे दूरदूर त्यांचे भागिदार रहात असले तरी त्यांचा एकमेकांवर प्रचंड विश्र्वास असतो.यापैकी प्रत्येक भागिदारांचे दुसरे ही भागिदार असतात.अशारीतीने त्यांची साखळी गुंतून जाते. 
म्हणून भागिदारीत धंदा सुरू करताना सर्व काही लिखीत व कायदेशीर स्वरुपाचे असावे.नाहीतर नंतर वाद निर्माण होतात.
5) प्रकल्प आराखडा तयार करणे : - प्रकल्प आराखडा हे व्यवसायाचे प्रमुख अंग होय.यामध्ये व्यवसायाचे स्वरुप ,रचना ,कायमस्वरुपी भांडवल,खेळते भांडवल,जागेची माहिती,विक्रीचा अंदाज ,उत्पादनाचा अंदाज ,उत्पादन खर्च ,नफ्यांचा अंदाज इत्यादि गोष्टींचा समावेश करुन एक आराखडा बनवून त्याप्रमाणे प्रकल्प राबवावा.आराखडा हा तज्ज्ञांकडून किंवा त्यांचे मार्गदर्शन घेऊन बनवावा. 
6) धंद्यासाठी जागेची अथवा इमारतीची निवड : - धंद्यासाठी योग्य जागेची निवड करुन त्या इमारतीची रचना करुन घ्यावी.व्यवसायासाठी योग्य अशी जागा निवडताना ग्राहकांची सोय ही महत्त्वाची असते.पर्यावरणाचा संतुलन,सरकारी नियम ,भाडे आणि गुंतवणूक यांचे नियम कटाक्षाने पाळावेत .




 .......................................................
परीक्षेच्या दृष्टीने केला जाणारा अभ्यास असो, वा नव्याने हाती घेतलेले किंवा दैनंदिन असे कोणतेही कार्य असो, त्यासाठी पूर्वतयारी हा एक अविभाज्य घटक आहे. कारण, पूर्वतयारी केल्यानंतर जे साध्य करायचे आहे, ते साध्य करणे सोपे जाते. मग एक उत्तम उद्योजक होण्याचे स्वप्न रंगवित नवखा उद्योजक नव्याने सुरूवात करू पाहत असलेला एखादा व्यवसाय तरी पूर्वतयारीपासून कसा दूर असेल ?
त्यामुळे एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्यासाठीही काही बाबींची पूर्वतयारी करण्याची आवश्यकता असते. जसे-
  • व्यवसाय सुरू करण्याचा मुख्य उद्देश.
  • उत्पादनाचे उत्पादन, उत्पादनाची विक्री किंवा सेवा क्षेत्र यापैकी व्यवसायाचे स्वरूप नक्की कोणते आहे, त्यावरून व्यवसायाचा आवाका ठरतो. त्यामुळे कोणता व्यवसाय करायचा आहे, (रिटेलर, होलसेलर, उत्पादक) याची स्पष्ट कल्पना असावी.
  • व्यवसाय कोठे करायचा आहे, ते ठिकाण व्यवसायासाठी योग्य आहे का ? व्यवसायासाठी लागणारी जागा ही भाड्याने असेल की स्वतःची असेल. भाड्याने असेल, तर त्यासाठीचा करार, भाडे आणि अनामत रक्कम यांचा पडताळा.
  • उत्पादित वा विक्री करीत असलेले उत्पादन वा पुरवल्या जाणा-या सेवेला बाजारपेठेत कितपत मागणी आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे.
  • व्यवसायासाठी आवश्यक कर्मचा-यांची संख्या किती असेल. त्यांच्या पगारापोटी दरमहा कितपत रक्कम अदा करावी लागेल.
  • ग्राहकांना आपल्यापर्यंत किंवा आपल्याला ग्राहकांपर्यंत कसे पोहोचता येईल.
  • व्यवसायात असलेली तुमची भूमिका.
  • व्यवसाय भागीदारीत असेल की स्वतंत्र. 
  • व्यवसायासाठी स्वतःचा पैसा कितपत वापरावा लागेल आणि कर्ज किती घ्यावे लागेल. त्यासाठी कोणत्या बँकेकडून कर्ज मिळेल. कर्ज मिळविण्याची प्रक्रिया.
  • व्यवसायासाठी सरकारच्या कोणत्या योजना आहेत का, त्याची माहिती.
  • व्यवसायातील प्रतिस्पर्ध्याबद्दल इत्थंभूत माहिती हवी. प्रतिस्पर्ध्याचे उत्पादन वा त्यांच्याकडून ग्राहकांना पुरवली जाणारी सेवा यामध्ये काय फरक असेल. 
  • तुमचा ग्राहकवर्ग कोणता असेल
  • तुमच्या व्यवसायाचे वेगळेपण असेल. ग्राहक प्रतिस्पर्धी सोडून तुमच्याकडे का आकर्षित होतील, याचीही कल्पना असायला हवी.
  • व्यवसायासाठी कच्च्या मालाचा पुरवठा कोण करेल
  • व्यवसायाची जाहिरात कोणत्या माध्यमातून करायची आहे.
  • व्यवसायासाठी आवश्यक त्या सर्व विम्यांची माहिती.
  • व्यवसायाच्या स्वरूपानुसार व्यवसाय आणि नावाची सरकार दरबारी नोंदणी
  • व्यवसायासाठी आवश्यक असलेले कौशल्य व पूर्ण माहिती.
  • कंपनीचा लोगो.