" पसायदान डिजिटल नेवासा " या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday, January 4, 2016

                    ध्येय/संकल्प 

एखादी गोष्ट घडवून आणण्यासाठी तिचा ध्यास घ्यावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो. धरसोड करणार्या व्यक्तीस कोणतंही यश मिळत नाही. तुमचे श्रम, पैसा, वेळ, लक्ष, मेहनत विखुरले गेले तर कोणतेही एक लक्ष्य साध्य होत नाही. जगातील यशस्वी कलाकार, क्रीडापटू, उद्योजक, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञानी यांची चरित्रे अभ्यासली असता, ते सगळे तन-मन-धन लावून एकाच विषयाचा, ध्येयाचा विचार करीत होते असे दिसून येते.
मागील काही लेखांत आपणमन म्हणजे काय?’, ‘त्याची जाणीव’, ‘त्याची कार्येयाविषयी विचार केला. आपण उद्योजक आहात किंवा होऊ इच्छिता. तुम्ही करोडो रुपयांचे व्यवसाय करणार्या अशा मोठ्या कंपनी/संस्था पाहिल्या असतील. त्यांची उलाढालीची नफ्याची वार्षिक टारगेट्स असतात. आपल ध्येय काय आहे? मन, शरीर, बुद्धी हे आपल्याकडील महत्त्वाचे भांडवल आहे, हे आपण जाणतो. त्याचा वापर करून आपण कोणतीही गोष्ट करू शकतो, मिळवू शकतो. आपण स्वत: सीइओ असून आपले मन आपला मॅनेजर आहे, आपलं काम आपण त्याच्याकडून करून घेऊ शकतो, असे समजून घेऊ. यशस्वी व्यक्ती आपल्या मनाचा वापर करून कोणतीही गोष्ट साध्य करू शकतात, घडवून आणू शकतात. ज्या वेळी मन ध्येयाने प्रेरित होतं, त्या विषयावरच मन एकाग्र होतं, त्या वेळी यश मिळतं, असंही आपण पाहिलं. आज आपण ध्येय कसं ठरवावं कसं साध्य करावं याविषयी विचार करू या. अर्थातच, मनाच्या वापराने हे कसं करायचं याची चर्चा आपण करू या.
ध्येय म्हणजे काय? ध्येय का असावं?
ध्येय म्हणजे तुम्हाला ठरावीक काळात काय हवे आहे? काय मिळवायचे आहे? ध्येय, उद्दिष्ट, goal, target या सर्वांचा सोपा अर्थ आहे, आपल्या सर्व गोष्टी करण्याचे कारण! आपण जे काही करतोय त्याने आपल्याला काय मिळवायचे आहे, कोठे पोहोचायचे आहे ते म्हणजे ध्येय? दुसर्या शब्दात सांगायचं तर, तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ, पैसा, मेहनत, विचार, लक्ष कोठे लावले आहेत, ते तुमचे लक्ष, ध्येय, सेरश्र. तुम्ही मागील सात दिवसांतील १६८ तासांपैकी ८० तासांत काय मिळवायचा प्रयत्न करीत होतात ते तुमचे ध्येय! आता यावर जर तुम्ही नीट विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की तुमचे नक्की काही एक ध्येय आहे किंवा नाही. तुम्ही स्वत:साठी काही करत आहात की दुसर्याच्या ध्येयाचा एक भाग झाला आहात? तुम्ही स्वत: ठरवून काही क्रिया करीत आहात की तुम्ही फक्त प्रतिक्रिया देत आहात? काय करावं, याचा गोंधळ तुमच्या डोक्यात झाला आहे काय? या प्रश्नांची उत्तरे द्या, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचे ध्येय तुम्ही ठरविले आहे का?
एखादी गोष्ट घडवून आणण्यासाठी तिचा ध्यास घ्यावा लागतो, पाठपुरावा करावा लागतो. धरसोड करणार्या व्यक्तीस कोणतंही यश मिळत नाही. तुमचे श्रम, पैसा, वेळ, लक्ष, मेहनत विखुरले गेले तर कोणतेही एक लक्ष्य साध्य होत नाही. जगातील यशस्वी कलाकार, क्रीडापटू, उद्योजक, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञानी यांची चरित्रे अभ्यासली असता, ते सगळे तन-मन-धन लावून एकाच विषयाचा, ध्येयाचा विचार करीत होते असे दिसून येते. आपणाला एखादा चित्रपट पाहायचा असेल, तर कशी तयारी करतो? किती त्यासाठी काहीही करतो? किती वेळ त्याचा विचार करतो? जर तीन तासांच्या चित्रपटासाठी आपण एवढा विचार कृती करतो, तर जीवनातील पाच, दहा, वीस वर्षांसाठी आपले काही ध्येय निश्चितच असायला हवे. त्यामुळे जगण्याला दिशा मिळते, अर्थ प्राप्त होतो, उत्साह वाढतो. आपल्यातील सुप्त गुण शक्ती आपल्याला कळतात.
ध्येयामुळे जीवनात नियमितता शिस्त येते. नियमिततेमुळे यश मिळते. विचार करा, तुम्हाला सकाळी दूध, पेपर देण्यापासून, बस-गाडी, अन्नपुरवठा, मोबाइल, औषधे, करमणूक, कपडे या अशा शेकडो वस्तू सेवा देणार्या संस्था नियमित यशस्वी आहेत ना? जशा या संस्था ध्येय ठेवून नियमित काम केल्याने यशस्वी आहेत, तसे आपणही होऊ शकतो.
हीच वेळ आहे, जर तुमचं कोणतंही एक नक्की ध्येय नसेल तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल, तर ते ध्येय ठरविण्याची!
ध्येयाचे प्रकार
ध्येय म्हणजे तुम्हाला ठरावीक वेळेत काय हवे किंवा मिळवायचे आहे? तेकाहीहीअसू शकतं. पैसा, घर, गाडी, लग् हे तर सर्व मान्य विषयच आहेत; पण ध्येय गायक होण्याचं, मोठा खेळाडू होण्याचं, वजन कमी करण्याचं, समाजसेवेचं, रागावर नियंत्रण मिळवण्याचं कसलंही असू शकतं. प्रश् हा आहे की तुम्ही नक्की ठरवलं आहे का तुम्हाला काय हवं आहे? किती हवं आहे? कसं हवं आहे? कधी हवं आहे? त्यासाठी अविरत प्रयत्न करायला तुम्ही तयार आहात ना? त्या यशासाठी किंमत तुम्ही मोजणार ना? तुमची अनेक प्रकारची ध्येय असू शकतात. उदा. तुम्ही एकाच वेळेस व्यवसाय १० लाख करायचा वजन दहा किलो कमी करायचं, अशी दोन ध्येय ठरवू शकता; पण मग त्यासाठी वेळ इतर साधनांची वाटणी नियोजन तसे करायला हवे या दोन ध्येयांचाच पाठपुरावा करायला हवा. तुमच्या वेळेचा, विचाराचा इतर साधनांचा खर्च काटेकोरपणे यासाठीच व्हायला हवा. या सर्व गोष्टी करताना आपले मनच आपला साथीदार भागीदार असते. या सार्या विश्वात आपले मन ही एकच गोष्ट अशी आहे की, ज्यावर आपले नियंत्रणअसू शकते’. आपल्याबाबत घडणार्या घटनांवर आपले नियंत्रण नसते. आपण त्यावर काय प्रतिक्रिया देतो ते महत्त्वाचे. अशी प्रतिक्रिया देताना, आता तुम्ही विचार कराल की, ही गोष्ट, ज्यावर आपण वेळ, पैसा, विचार, भावना खर्च करत आहोत, ती ध्येयाशी संबंधित किंवा त्याजवळ नेणारी आहे का, तरच त्यावर प्रतिक्रिया द्यावी, अन्यथा त्यावर मानसिक शारीरिक शक्ती खर्च करू नये.
ध्येय कसे ठरवावेध्येय म्हणजे तुम्हाला ठरावीक वेळेत काय हवे किंवा मिळवायचे आहे? हा प्रश् परत विचारण्याइतका महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला नक्की काय हवे आहे? किती? कधी? ज्यांनी आयुष्यात यश मिळविले त्यांनी त्यांना आवडणार्या विषयात ध्येय ठेवले त्यांतच काम केले, त्याचाच विचार केला. तुम्हाला गायक व्हायचे आहे, पण तुम्ही फुटबॉल सामने बघत राहिलात, तर काय उपयोग, तुम्हाला कोट्यधीश व्हायचे आहे, तर तुम्ही नोकरी केल्याने ते साध्य होईल का? तर, तुमच्या आवडत्या विषयातील ध्येय ठेवा. त्यामुळे तुम्हाला त्यात काम करायला कंटाळा येणार नाही, तुम्ही दमणार नाही कायम उत्साहात भरपूर मेहनत कराल.
त्याचप्रमाणे, तुमचे ध्येय SMART असू द्या.
S म्हणजे डशिलळषळल ध्येय मोजक्या शब्दांत, आकड्यांत, तारखेत व्यक्त करा, ते लिहून काढा,
M म्हणजे Measurable असू द्या. नुसतंभरपूर श्रीमंत व्हायचंय’, हे ध्येय नव्हे. ‘मला ३१ मार्च २०१६ पर्यंत १०० कोटी रुपये मिळवायचे आहेत’, हे ध्येय आहे. ध्येय मोजण्यासारखे ठरविल्यामुळे, त्यातील पायर्या, विभाग ठरविता येतात, मोजता येतात.
A म्हणजे Achievable. सुरुवातीला तुम्हाला दृष्टिपथात असेल असे ध्येय ठेवा, ज्यामुळे ते साध्य केल्यामुळे पुढे मोठी ध्येय ठेवण्याचा उत्साह वाढेल.
R म्हणजे Realistic. तुमच्या ध्येयातील टप्पे तुम्हाला ठरविता आले, तर तुमचे ध्येय realistic आहे.
T म्हणजे ढळाश Time Bound. तुमचे ध्येय तुम्हाला कोणत्या दिवसापर्यंत गाठायचे आहे, ते ठरवा. त्यामुळे ध्येय गाठण्यातील टप्पे तुम्हाला ठरविता येतील. उदा. तुम्हाला बारा महिन्यांत १०० कोटी मिळवायचे असतील तर प्रत्येक तिमाहीत २५ कोटींसाठी नियोजन करावं लागेल.
आपलं आठ ते दहा शब्दांचं ध्येयवाक्य ठरवा. ते कायम मनात रुजवा, त्याचा जप करा, ते लिहून ठेवा. त्याचे फलक करून तुमच्या घरात कार्यालयात लावा. ते लोकांना सांगा, म्हणजे लोकही तुम्हाला विचारून त्याची आठवण करून देतील. तुम्ही ठरविलेले ध्येय तुम्ही गाठणारच यांवर तुमचा विश्वास हवा.
ध्येयवाक्याची काही उदाहरणे३१ मार्च २०१६ पर्यंत मला १०० कोटी रुपये मिळत आहेत.
माझ्या उत्पादनाची विक्री ३१ डिसेंबरपर्यंत १० लाख होत आहे.
३० ऑगस्टपर्यंत माझे वजन 68 किलो होत आहे.
१५ ऑक्टोबरपर्यंत मी इंग्लिश बोलायला शिकत आहे.
असं तुमचं ध्येयवाक्य तुम्ही आताच लिहून काढा सुरू करा ध्येयाचा रोमांचकारी प्रवास आणि तुम्ही बघाल की, आयुष्यात कोणतीही गोष्ट करणं शक्य आहे. तुम्ही ठरविण्याचाच अवकाश!
ध्येय गाठण्याचा आराखडाआता एकदा काय करायचं कोणत्या दिवसापर्यंत हे नक्की ठरविल्यावर, आपण प्रकल्पाचा आराखडा तयार करू या. सर्वात आधी आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला कोणत्या माहिती, ज्ञान, वस्तू, व्यक्ती, जागा, पैसा अशा साधनांची सविस्तर यादी करावी. त्याची उपलब्धता आपल्याला निश्चित करावी लागेल. त्यासाठी क्रमबद्ध कार्यक्रम लिहून काढा. आपल्या ध्येयाच्या दृष्टीने आवश्यक, पण आपण करू शकत नाही, अशा गोष्टींसाठी इतरांची मदत घ्यावी लागेल. जसं की तुम्ही चांगलं उत्पादन बनवू शकता, पण तुम्हाला विक्री करणे जमत नाही, तर त्यासाठी दुसर्या व्यक्तीची नेमणूक करा. लक्षात ठेवा, तुमचे ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला मित्र, शेजारी, नातेवाईक, सहकारी, भागीदार, अशा अनेक जणांची मदत लागणार आहे होणार आहे. म्हणून सर्वांना घेऊन पुढे जाण्याची तयारी ठेवा. त्यासाठी मानवी स्नेहसंबंध सुधारण्यावर भर द्या. नवीन पद्धती, व्यवस्था, नियम शिकण्याची तयारी करा.
आता थोडं आकड्यांशी खेळू या. समजा, तुमचं एक वर्षाचं ध्येय तारीख ठरली. आता ते बारा महिने किंवा ५२ आठवड्यांत विभागा. पाहा, किती छोटं सोपं झालं ते. क्रिकेटच्या सामन्यातही एका षटकात किती धावा करायच्या ते ठरवूनच ३००-३५० धावा ५० षटकांत उभारतात, हे तुम्ही पाहिले आहेच. तर, त्यानुसार तुमच्या ध्येयाचा दर आठवड्याचा दिवसाचा कार्यक्रम आराखडा तयार करा. दिवसभरात किती काम करायचे, कोणाला भेटायचे, कोणाला फोन करायचे, मेल पाठवायच्या, कोणाकडून कोणते काम करून घ्यायचे, कोणाकडे कोणत्या कामाविषयी अहवाल मागवायचा, हे सर्व लिहून काढा. अशा यादीला to-do-list म्हणतात. करायची कामे लिहून काढल्यावर ती कामे होण्याची आपण करण्याची शक्यता खूपच वाढते. पुढचं महत्त्वाचं काम म्हणजे पैशाचे हिशेब. तुमचं वार्षिक जमा-खर्चाचे अंदाजपत्रक तयार करा. तुम्ही व्यवसायाशी संबंधित सर्व बाबींचा विचार करा. त्यानुसार तुम्हाला तुमच्या उत्पादनाची वा सेवेची वाजवी किंमत ठरवता येईल. अशा अंदाजपत्रकाचं महिन्याच्या पातळीवरचं कोष्टक तयार करा त्याचा आढावा घ्या. या सर्व गोष्टी लिहून काढून तुम्ही एक आंतरिक शिस्त तयार करता तिचे पालन केल्यास तुमचे ध्येय साध्य होण्यास मदत होते.
या तुम्ही बनविलेल्या आराखड्याचा मुख्य उपयोग तुम्हाला तुमच्या उद्दिष्टाची कायम आठवण देणे हा होय. त्यामुळे तुम्ही सदैव ध्येयाचा विचार करता इतर गोष्टींत तुमचे लक्ष विचलित होण्याचे प्रमाण खूप कमी होते. आता तुम्हाला मनाची कार्ये ज्यांचा आपण मागील लेखात अभ्यास केला, एकाग्रता, तर्क, गणित, आत्मविश्वास, संयम, आयोजन, भावना, स्मरणशक्ती यांची मदत आपल्या ध्येयपूर्तीसाठी कशी होईल, हे समजायला मदत होईल. मन हे चोवीस तास कार्यरत असते. आता तुम्ही त्याचा स्वेच्छेने वापर करून, त्यांवर नियंत्रण ठेवून ध्येय गाठण्यासाठी वापर कराल. एका दिवसात आपल्या मनात ५० हजार विचार येतात, त्यापैकी अर्ध्याहून अधिक विचार तुमच्या ध्येयाचेच असतील, तर तुम्ही ते विसरू शकणार नाही तुम्ही यशस्वी होणारच! शंका वाटत असेल तर आधी करूनच बघा!
 ....................................................................................................................................


                                                     संकल्प 
जीवनात यशप्राप्ती करायची असेल, तर संकल्प करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच संकल्प तडीस नेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते म्हणून त्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करा. यश तुमचेच आहे.
गांडूळ उद्योजक होऊन शेतकर्याचा मित्र होतो, एक मधमाशी उद्योजक होऊन जगासाठी मध देऊन जाते, एक रेशमाचा किडा उद्योजक होऊन रेशीम देऊन जातो. मी तर एक माणूस आहे. मग माझे योगदान किती असायला हवे? मी किती मोठा उद्योजक व्हायला हवे? याचा आपण विचार केला, तर आपणही नजीकच्या काळात एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला येऊ. या जगातील प्रत्येकामध्ये सुप्त शक्ती दडलेली असते आणि प्रचंड कार्यक्षमता असते. आपल्यातील सुप्त शक्ती आणि प्रचंड कार्यक्षमता ओळखा. स्वत:मधील सुप्त शक्ती ओळखून जागृत करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाला विजेता व्हायचे असते.
धीरूभाई अंबानी पेट्रोलपंपवर काम करत होते, अमिताभ बच्चन पडद्यावरील छोटा कलाकार होता, रजनीकांत बस कंडक्टर होता, मनमोहन सिंग ओबेरॉय हॉटेलमध्ये काम करत होते, नारायण मूर्ती लॅब असिस्टंट होते, शाहरूख खान टीव्ही सीरिअलमध्ये काम करत होता, महेंद्रसिंग धोनी हा रेल्वेमध्ये टी.सी. होता, जॉनी लिव्हर धारावीच्या झोपडपट्टीत राहत होता. जर या सामान्य व्यक्ती यशस्वी उद्योजक होऊ शकल्या, तर तुम्हीही तुमच्या जीवनात यशस्वी उद्योजक होऊ शकता. मोठी स्वप्ने पाहा, ध्येय लिहून ठेवा आणि विजेता व्हा.
कराटे-कुंगफूची कला अवगत केलेल्या ब्रूस लीने मोठे स्वप्न पाहिले, आपले ध्येय लिहून ठेवले आणि तो विजेता झाला. दिनांक जानेवारी १९७० रोजी त्याने लिहिलेले ध्येयपत्र न्यूयॉर्कमधील प्लॅनेट हॉलीवूड या ठिकाणी आजही प्रदर्शनात ठेवलेले आहे. ते ध्येय पुढीलप्रमाणे होते१९८० पर्यंत मी अमेरिकेतील नामवंत सिनेनट असेन, मी १० मिलिअन डॉलर्स कमवीन, या पैशाच्या मोबदल्यात मी प्रत्येक वेळी चांगली कामगिरी बजावीन आणि माझ्या भूमिकेने मी लोकांची मने जिंकीन. ब्रूस ली हा एक सिनेनट होता, ही त्याची जगाला माहीत असलेली ओळख; पण चित्रपटनिर्मिती हा त्याचा उद्योग होता, हे आपल्याला विसरून चालणार नाही.
वॉरन बफेट हे जगातील श्रीमंतांच्या यादीतील दुसर्या क्रमांकावरील व्यक्तिमत्त्व म्हणतात, “गुंतवणूक करायची, तर स्वत:च्या व्यक्तिमत्त्वावर करा.” त्यांनी व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे घेतले आहेत. वॉरन बफेट हे आपल्या व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षणाचे प्रशस्तिपत्रक रोज पाहतात आणि झपाटल्यासारखे पेटून उठून काम करतात. आपणही व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे घेऊन आपल्यामध्ये दडलेली सुप्त शक्ती जागृत केली पाहिजे. सतत शिकत राहिले तर आपणही विजेता होऊ शकतो.
आपणच आपल्या उद्योगाचे शिल्पकार असतो. यशाच्या प्रवासाला सुरुवात करा. स्वत:ला प्रवाहात झोकून द्या. होय, आजचे तुमचे स्वरूप कदाचित नदीसारखे असेल, वाहत राहा. तो दिवस दूर नाही, ज्या दिवशी अथांग महासागरासारखे यश तुमच्याकडे येईल. आजपर्यंत काय झाले, याचा विचार करू नका. आजचा दिवस एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी शुभमुहूर्त आहे, असे समजून यशाची स्वप्ने रेखाटायला सुरुवात करा. तुम्ही खरोखरच यशस्वी उद्योजक होऊ शकता. तुमची आजची परिस्थिती काय आहे आणि आज तुम्ही कोण आहात, याची अजिबात पर्वा करू नका. तुम्ही तुमच्या आयुष्याचे नव्याने नियोजन करून जीवनाचा आनंद उपभोगू शकता. मानसशास्त्राचा एक असा नियम आहे की, तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये स्वत:विषयी विचारांचे जे चित्र उभे करता, कालांतराने तुम्ही त्या चित्रामध्ये स्वत:ला पाहता आणि तसेच बनता.
एक तीस वर्षीय महिला होती. पती आणि दोन मुलं असे तिचे छोटेसे कुटुंब होते. तशी ती सुखी होती, पण चाकोरीबद्ध जीवन जगत होती. वाढत्या वयाबरोबर तिला जाणीव होत होती की, ती एक सामान्य स्त्री आहे आणि ती जगायचं म्हणून जगत आहे. तिच्या कुटुंबाला तिची फारशी गरज भासत नव्हती.
एके दिवशी गाडी चालवत असताना या स्त्रीचा अपघात झाला आणि काही काळ ती बेशुद्धावस्थेत होती. जेव्हा ती शुद्धीवर आली, तेव्हा तिचा स्मृतिभ्रंश झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून समजले. तिचा नवरा, मुले, डॉक्टर, नातेवाईक आणि मित्रमंडळी सर्वांना तिच्याविषयी सहानुभूती निर्माण झाली. ते सगळेच तिची काळजी घेऊ लागले, तिच्याशी प्रेमाने, आपुलकीने वागू लागले, त्यामुळे त्या स्त्रीला आपण कोणी तरी महत्त्वाची व्यक्ती आहोत, याची जाणीव होऊ लागली.
त्या स्त्रीने आपल्या फावल्या वेळेत स्वत:चा उद्योग सुरू केला. पाहता पाहता तिला त्या उद्योगात भरघोस यश मिळू लागले. तिची ही एक यशस्वी उद्योजिका म्हणून नव्याने नावारूपाला आलेली भूमिका लोकांना खूप आवडली. सर्वांनी तिचे कौतुक केले. त्या स्त्रीला तिचे महत्त्व पटले. तिच्या जीवनाला एक नवीन अर्थ प्राप्त झाला. तिला एक नवीन दिशा मिळाली. विचार बदलल्यामुळे तिला एक नवीन जन्म मिळाला. या उदाहरणातून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की, जर आपणही विचार बदलले तर आपलेही जीवन बदलेल.
आपण कोणतीही कल्पना आणि विचार घेऊन या जगात येत नाही. एखाद्या कोर्या पाटीप्रमाणे आपले जीवन असते. जे आपण लहानपणापासून शिकतो, तेच आपल्या मेंदूवर कोरले जाते आणि आपण त्या कोरलेल्या विचारांप्रमाणे जीवन जगतो. आपण स्वत:विषयीचा जो समज निर्माण केला आहे, त्याप्रमाणे आपण वागतो. आपण या जगात कोणत्याही भीतीशिवाय येतो; पण काळाच्या ओघात अपयशाची, टीकेची, झिडकारले जाण्याची, नुकसानाची भीती आपण आत्मसात करतो आणि अचानकमला शक्य नाहीया विचारांमध्ये स्वत:ला अडकवून टाकतो. एखादा प्रयत्न करण्याआधीच आपण माघार घेतो, कारण आपल्या मेंदूत भीतीचे घरकुल तयार होते. अशा प्रकारच्या नकारात्मक भावनांमुळे निर्माण झालेल्या भीतींना खतपाणी पुरवणे टाळा. आय.बी.एम.चे माजी संस्थापक थॉमस वॅटसन म्हणतात, “जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल, तर आधी अनेकदा अपयशी व्हा. अपयशाच्या पायर्या चढल्यावरच यश संपादन होते.”
आफ्रिकेमध्ये एक शेतकरी होता. एक दिवस त्याच्याकडे एक शहाणा मनुष्य आला. त्याने शेतकर्याला हिर्याचे महत्त्व समजावून सांगितले. तो शहाणा माणूस म्हणाला, “जर तुझ्याजवळ अंगठ्याएवढा हिरा असेल, तर तू या शहराचा मालक होऊ शकतोस. जर तुझ्याजवळ हिर्याचा खजिना असेल, तर तू या देशाचा राजा होऊ शकतोस.”
त्या रात्री शेतकरी झोपला नाही. आपल्याकडे एकही हिरा नाही, ही खंत त्याला सतावत राहिली आणि त्याने हिरा मिळवण्याचा निश्चय केला. दुसर्या दिवशी त्या शेतकर्याने आपले सर्व शेत विकून टाकले. कुटुंबाची खाण्यापिण्याची व्यवस्था करून तो हिर्याच्या शोधात बाहेरगावी निघून गेला. त्याने संपूर्ण देश पालथा घातला, पण त्याला हिरे मिळाले नाहीत. तो युरोपमध्ये गेला, स्पेन देशात गेला, पण त्याच्या पदरी निराशाच आली. शेवटी कंटाळून त्याने नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केली.
ज्या माणसाने त्या शेतकर्याचे शेत विकत घेतले, त्याला आपल्या शेतात इंद्रधनुष्यासारखा चमकणारा दगड दिसला. त्याला तो दगड आवडला आणि त्याने तो उचलून घरात बैठकीच्या खोलीत ठेवला. एक दिवस तो शहाणा माणूस या शेतकर्याकडे आला आणि त्याने तो चमकणारा दगड हिरा आहे, हे ओळखले. शहाणा माणूस त्या शेतकर्याबरोबर शेतावर गेला आणि तेथील काही दगड प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून दिले. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार तो दगड खरोखरच हिरा होता. त्या हुशार माणसाने शेताचे निरीक्षण केले आणि त्याला असे आढळून आले की, शेतामध्ये जागोजागी कित्येक एकरामध्ये असे हिरे दबलेले होते.
संधी आपल्याजवळच आहे, तिला शोधण्यासाठी इकडेतिकडे जाण्याची गरज नाही. गरज आहे ती संधी ओळखण्याची. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. समोर आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्या. रोज स्वत:ला प्रश्न विचारा, “आज आपण जे काही केले त्या कर्तव्यात कसूर तर केली नाही ना?” आहोत तोवर चांगले, समृद्ध जीवन निरपेक्षपणे जगायचे. कोणावर ओझे व्हायचे नाही आणि कशाची हाव बाळगायची नाही, त्यामुळे या गोष्टी गेल्या तरी एका मर्यादेपुढे खंत वाटणार नाही. जीवनात यशप्राप्ती करायची असेल, तर संकल्प करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच संकल्प तडीस नेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते म्हणून त्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करा. यश तुमचेच आहे.
जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची इच्छा होते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण मनापासून जी तयारी करतो, जो प्रयत्न करतो, त्याला संकल्प असे म्हणतात. यशस्वी व्यक्ती संकल्पाच्या आधारे स्वत:चे स्वप्न साकार करतात आणि यशस्वी होतात. जे जीवनात यशस्वी होत नाहीत, ते फक्त स्वप्नांचे मनोरथ बांधतात, पण त्यासाठी कृती करत नाहीत.
प्रत्येक संकल्पाचे उगमस्थानमीआहे. आपली इच्छा वेगळी आणि आपण केलेला संकल्प वेगळा असतो. उदा. मी कन्याकुमारीला जाईन, ही इच्छा झाली. मी कन्याकुमारीला जाण्यासाठी सोमवारी निघणार आहे, हा संकल्प झाला. मी कन्याकुमारीला निघालो, ही कृती झाली. जेव्हा आपण महत्त्वाच्या इच्छेची निवड करून त्या इच्छेला महत्त्वाकांक्षेत रूपांतरित करतो, तेव्हा ती महत्त्वाकांक्षा आपल्याला कार्यरत करून संकल्पसिद्धीस मदत करते.
काही व्यक्ती इच्छा तर खूप बाळगतात. वर्षाच्या शेवटच्या दिवशी संकल्पही करतात, पण काही व्यक्ती केलेला संकल्प काही वेळातच विसरून जातात, तर काही जण थोडा काळ त्या संकल्पावर कार्यरत होतात. पुढे तेही त्या संकल्पावर पाणी सोडतात. अगदी मोजक्या व्यक्ती आपल्या संकल्पांवर ठाम राहतात आणि पुढचे पाऊले टाकून केलेला संकल्प तडीस नेतात, तेच यशस्वी उद्योजक होतात.