" पसायदान डिजिटल नेवासा " या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Thursday, December 15, 2016

                            तरूण शेतकरी 
पोल्ट्री, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय 
नोकरी सोडून महिन्याला 2 लाख कमावणारा इंजिनिअर शेतकरी पुण्यातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून विदर्भातील एक तरुण पुन्हा गावाकंड परतला. शेळीपालन आणि दुग्ध व्यवसायांचा अभ्यास केला. प्रशिक्षण घेतल आणि व्यवसायास सुरुवात केली. आज या तरूणाला शेतीपूरक व्यवसायातून महिन्या काठी 2 लाखांचा पगार मिळतोय. 
30 गायीचा प्रशस्त गोठा 200 ते 250 गावठी कोंबड्या 100 बकर्‍याचा मुक्त संचार गोठा आणि यांच्या चार्‍यासाठी 2 एकरात यशवंत गवत, बुलढाण्याच्या उच्च शिक्षित विजयसिंह राजपूत या तरूण शेतकऱ्यांचे हे शेतीपूरक व्यवसाय.
इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असलेल्या विजयने शिक्षणानंतर पुण्यात नोकरीस सुरुवात केली. मात्र समाधान काही मिळत नव्हते. यातच पश्चिम महाराष्ट्रातील मित्राच्या फार्म हाऊसवर जाणे झाले दुग्ध व्यवसाय बकरी पालन, कुक्कुटपालन याविषयी माहिती मिळाली. नव्या व्यवसायाचा मार्ग सापडेल. नोकरीला अलविदा केला आणि गाव गाठले, खामगावजवळील पोरज गावातील वडिलोपार्जित जमिनीत हळूहळू व्यवसाय सुरू केला.
विजयने सुरूवातीला बकरी पालन आणि दुग्ध व्यवसायाचे प्रशिक्षक घेतले. जुन 2015 मध्ये आयडीबीआय बॅग
बँकेकडून 15 लाखोचे कर्ज घेतले 15 जरशी गायी विकत घेऊन दुग्ध व्यवसायास सुरुवात केली. हळूहळू व्यवसायाचा पसारा वाढवला वर्षभरातच 50 शेळ्या विकत घेऊन शेळीपालन सुरू केले. तर जोडीला गावठी कोंबड्या ही आणल्या. आता विजय कडे 30 गायी आहेत. या दिवसभरात अडीचशे लिटर दूध देतात ज्याची तो आसपासच्या परिसरात विक्री करतो.
विजय गायी आणि बकरी च्या आहारकडे विशेष लक्ष देतो. दिवसातून तीन वेळा यशवंत गवत, सुग्रास, मका आणि कडबा गायींना दिला जातो. तर बकरयानाही मुबलक प्रमाणात चारा मिळतो. जवळच पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे ही जनावरे धष्टपुष्ट आहेत.
१) विजय दुधाची 25 रूपये लिटरने विकी करतो. यातून दिवसाकाठी त्याला 6 हजार रूपये मिळतात.
२) यातून 3000 मजुरी पशुखाद्य आणि वाहतुकीचा खर्च वजा जाता त्याला 3000 रूपये शिल्लक राहतात. शिवाय शेणखताच्या विकीतून वर्षाकाठी 3 लाख रूपये मिळतात.
३) आतापर्यंत विजयने 70 शेळ्यांची विक्री केली असून यातून त्याला 200000 ते 250000 लाखांचा नफा झाला आहे.
४) तर कोंबड्याची अंडी आणि कोंबड्या च्या विक्रीतून ही अतिरिक्त नफा होतो.
५) सर्व खर्च वजा जाता विजयला महिन्याला 2 लाखांचे निव्वळ उत्पन्न शिल्लक राहते.
आजच्या तरूणपिढीचे गावाकडून शहराकडून धाव घेण्यापेक्षा गावात संधी शोधावी. शेतात लक्ष घालावे स्वत :च्या विकसासोबत गावेही स्मार्ट करावी देशाच्या विकासाचे हेच गमक असेल असे विजय ठामपणे सांगतो. विजयचा हा शेतीपूरक व्यवसाय अनेक तरूणाना प्रेरणादायी असाच आहे