मित्रानो प्रत्येकाला वाटत आपण खूप मोठ्ठ व्हाव खूप खूप पैसे कमवावे . सुखी समाधानी आनंदी आयुष्य जगाव . त्यासाठी तो मनापासून प्रयत्नं करतोही परंतु त्याला निराशाच पदरी पडते . अशावेळी तो खूप खचून जातो आणि वेगळ्या मार्गाला लागतो या अपयशाला तो आपल शेवटचा निर्णय मानतो आणि अपयशाने दुखी मनाला तो व्यसनांच्या आधार देत आपल उर्वरित आयष्य वय घालवतो . आपण एवढ शिकूनही आपल्याला न नोकरी मिळाली अन ना धंद्यात यश मिळाल यातच आपली या अश्या विचारातच आपल्याला आजची तरुणाई बघायला मिळेल , काही याला अपवाद हि ठरतील परंतु त्यांची संख्या बोटावर मोजण्या इतपत असेल यात शंका नाही ,. का म्हणून या निराश झालेल्यांना समजत नाही कि अपयश हीच यशाची पहिली पायरी असते ते , का म्हणून यांना अस वाटत कि यांना मिळालेली संधी हि शेवटची असते अस आणि अस मानून निराशा नाहीतर काय आनंद याच्या पदरी पडणार . आणि हो काही महाभाग तर याचापाई काही आपल आयुष्य संपवतात ,या तात्पुरत्या समससेवर यांना मृत्यू हाच कायमचा इलाज वाटतो . का म्हणून यांना ह्या एवढ्या सुंदर आयुष्याला जगाव अस वाटत नाही .
मला तर जिंकत असतांना हरनार्यांची आणि वेळेआधी मरणाऱ्याची अश्या लोकांची नेहमीच चीड वाटते .
अश्याच जिंकत असतांना हरणाऱ्या आणि वेळेआधी मरणाऱ्या लोकांसाठी मला काहीतरी वेगळ करायचं आहे परंतु माझी सुरवात या ब्लोग्मधून लिखाणाने झाली . भरपूर शिकून पुस्तकाला रद्दी समजणार्यांना सांगायचं आहे कि तुम्ही वाचलेले पुस्तके वाया गेली नाही फक्त त्याद्वारे मिळवलेल्यान्यानाचा उपयोग करण्याची वेळ आली नाही , नोकरी मिळाली नाही म्हणून काय निराश व्हायचे नोकरीतून काय पैसाच कमवणार ना तर पैसा कमविण्यासाठी गरज आहे प्रामाणिक मेहनतिची मग त्यासाठी उद्योग धंदा करा तुम्हाला जन्माला घातलेल्या तुमच्या आई वडिलांना तुमचा गर्व वाटावा अस काही करा , तुमचा माणसाचा जन्म असाच वाया घालवण्यापेक्षा त्याच काहीतरी चीज करा . अशाच खूप शिकूनही निराशा पदरी पडलेल्यांसाठी , तसेच उद्योग करायचा आहे पण मार्गदर्शना अभावी मनात नुनागंड असल्याने मागे राहिलेल्या साठी तसेच नशिबाला दोष देत बसत आपल आयुष्य वाया घाल्वानार्यासाठी मी घेऊन आलो आहे उद्योगाविषयी माहिती ,यात मिळवलेली माहिती मी आपल्यासमोर ठेवणार आहे हि माहिती माझी स्वताची लिखित नसून माझ्यासारख्याच इतरही सुज्ञ लोकांनी , उद्योगाविषयी प्रेम असणार्र्यानी लिहिलेली माहिती मी माझ्या ब्लोग मधून प्रसिद्ध करणार आहे, मला याप्रकरणी बर्याच जनांनी लिहलेली माहिती मिळाली परंतु ती कुठेच पूर्ण नाही परंतु दितैल आहे ज्यांच्या माहितीचा मी वापर करणार आहे त्या लोकांचा मी अप्रतेक्ष्पाने आभार मानतो .तर मग बनायचं न उद्योग पती तर वाचा मग माझा हा ब्लोग उद्योग्मित्र
उद्योगात मोठी स्वप्ने पाहणे गरजेचे आहे. पण नुसती स्वप्ने रंगवत बसता ठराविक काळात ही स्वप्ने कशी अमलात येतील, कशी प्रत्यक्षात येतील याचा उद्योजकाला ध्यास असणे आवश्यक आहे. नवनवीन आव्हाने सतत स्वीकारणे, झगडून त्यातून यश मिळविणे हा गुण उद्योजकात असणे आवश्यक आहे.
निश्चित उद्दिष्ट, त्वरित व अचूक निर्णय, कार्यक्षम योजना, कृती आणि चिकाटी या उद्योगासाठी आवश्यक आहेत. उद्योग सुरू करताना नवीन उद्योजकाने आपले निश्चित उद्दिष्ट ठरवणे खूप महत्त्वाचे आहे.
‘कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर पात्रता सिद्ध करावीच लागते.’ धोका पत्करल्याशिवाय गत्यंतर नाही. श्रम करायलाच हवेत, तरच आजच्या स्पर्धेच्या युगात तुम्ही तराल. धडपडताना, लढताना, काही मिळवताना यश-अपयश दोन्ही येणारच. एखाद्या वेळेस अपयश आले तरी, लक्षात ठेवा अपयशाचे फायदेही असतात, अपयश माणसाला अंतर्मुख करतं, प्रगल्भ बनवतं, शहाण करतं आणि यशाकडे जाणारा मार्ग दर्शवितं.
उद्योग करायचा तर उद्योजकीय गुण अंगीकारणं खूप महत्त्वाचं आहे. उद्योजकाला मुत्सदीपणा, सकारात्मक मानसिकता, आधुनिक तंत्रज्ञान, स्पर्धात्मक किंमत, आक्रमक व्यापारी नीती या उद्योजकीय गुणांच्या शिदोरीचा उपयोग करण्याची गरज आहे. व्यवसाय सुरू केल्यावर तो व्यवसाय कसा चालला आहे, कसा केला पाहिजे याचं भान असणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या उद्योगाचं उद्दिष्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. स्वत:ची उद्दिष्टं साकार करताना खालील बाबींचा विचार व्हावयास हवा.
० आपलं उद्दिष्ट वास्तवादी असावं आणि आपल्या स्वप्नानुसार ते रेखाटावं.
० कागदावर लिहून त्याची आखणी करावी.
० आपण त्या साध्यापर्यंत कसे, कधी पोहोचणार, याबद्दल तज्ज्ञांच मार्गदर्शन घ्यावे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वत:वर विश्वास ठेवावा. संघर्षांला सामोरे जायचे धाडस उद्योजकाने केले पाहिजे.
उद्योजकाला यशस्वी होण्यासाठी अस्वस्थता हवीच. उद्योजकाचा पिंड स्वच्छंद आकाशात उडण्याचा, कोणत्याही प्रकाराचं आव्हान स्वीकारण्याचा असावा. एखादा उद्योग करावयाचा निश्चित केला की, त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे आणि अभ्याससुद्धा सूक्ष्म असावा. ढोबळ माहितीवर उद्योग करणे योग्य नाही. त्याचा चौफेर विचार व्हावयास हवा. कोणत्याही उद्योगाच्या प्रकल्पाचा व्यवस्थित विचार करून निर्णय घ्यावा. कोणत्याही उद्योगव्यवसायाचे यश हे त्याच्या उत्पादनाला, सेवांना बाजारपेठेत कशी व किती मागणी आहे यावर अवलंबून असते. या दृष्टीने कोणताही उद्योगव्यवसाय सुरू करताना विक्रीचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. उद्योग यशस्वी करण्यासाठी मोठी समस्या ही मार्केटिंगची असते. कित्येक वेळा उत्कृष्ट दर्जा, गुणवत्ता असूनसुद्धा योग्य वितरणाअभावी दर्जेदार उत्पादन गोडाऊनमध्ये पडून असते.
उद्योग सुरू केल्यानंतर एक गोष्ट मनाशी पक्की केली पाहिजे की, कोणताही व्यवसाय इतरांच्या मदतीशिवाय उभारता येत नाही. व्यवसायात यश मिळवायचं असं म्हणताना अनेकजण दिसतात, परंतु प्रत्यक्षात खूप कमी जण यशस्वी होताना दिसतात. काहीतरी वेगळं करून दाखवण्याची मनीषा, इच्छा खूपच कमी जणांमध्ये असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये यश मिळविण्यासाठी आवश्यक असणारे सुप्त गुण असतात. गरज असते त्या सुप्त गुणांचा विकास करण्याची.
व्यवसाय सुरू करताना निरंतर अभ्यास, आत्मपरीक्षण, ग्राहकाची मानसिकता, विनयशीलता, निरीक्षण शक्ती, उत्सुकता, सकारात्मक वृत्ती हे गुण आवश्यक आहेत.
उत्पादनामधील सातत्य, ग्राहकांच्या गरजा, कामगारांना प्रोत्साहन, नियोजन, विक्री कौशल्य जितक्या बाबी महत्त्वाच्या आहेत त्याचप्रमाणे व्यवसायात नावीन्यता असणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
व्यवसाय सुरू करताना पुढील तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.
० उद्योगधंद्याचे रजिस्ट्रेशन
० कोणाकडे कोणती कामे केली जातात?
० कोणाकडून कोणती परवानगी घ्यावी?
व्यवसायाचे रजिस्ट्रेशन
एकदा उद्योग सुरू करायचे ठरले की, त्या उद्योगाचे रजिस्ट्रेशन करणे गरजेचे असते. उद्योगाचे रजिस्ट्रेशन हे जिल्हा उद्योग केंद्रामध्ये केले जाते. जिल्हा उद्योग केंद्राचे कार्यालय हे प्रत्येक जिल्ह्य़ाच्या ठिकाणी असते. अशा ऑफिसमध्ये २५ रुपये भरून एक ट्रिप्लिकेट असलेला फॉर्म भरून द्यावा लागतो. त्या फॉर्ममध्ये सविस्तर माहिती द्यावी लागते. या फॉर्ममध्ये जो उद्योग अथवा व्यवसाय आपण करणार आहात त्याची सविस्तर माहिती द्यावी लागते. त्या ऑफिसची जागा, पत्ता, फॅक्टरीची जागा, उद्योगधंदा कोणत्या स्वरूपाचा आहे, त्याचे उत्पादन कोणत्या स्वरूपाचे असेल, त्यात कुशल व अकुशल कामगारांची संख्या अशी सर्व माहिती भरून द्यावी लागते. काही कच्चा माल परदेशातून मागवावा लागत असल्यास त्याचाही तपशील सविस्तर प्रमाणात द्यावा लागतो.
उद्योगधंद्याचे रजिस्ट्रेशन करताना योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. उदा. ज्या ठिकाणी उद्योग सुरू करावयाचा आहे, त्या जागेचा सात-बाराचा उतारा, ती स्वत:ची आहे की भाडय़ाने घेतली आहे, त्या ठिकाणी उद्योग सुरू करण्यासंबंधी ना हरकत प्रमाणपत्र हे नगरपालिका किंवा ग्रामपंचायत यांच्याकडून घ्यावे लागते. तसेच बँक अथवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घ्यायचे असेल तर त्यासाठी प्रकल्प अहवाल (प्रोजेक्ट रिपोर्ट) द्यावा लागतो. त्यात आपल्या उद्योगासंबंधी थोडक्यात माहिती द्यावी लागते. उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे स्थिर भांडवल व खेळते भांडवल याचा पूर्ण तपशील त्यामध्ये असणे आवश्यक असते. उद्योगासाठीची जागा, इमारत, यंत्रसामग्री, कच्चा माल व नोकरवर्ग इ. माहिती, तसेच ज्या जमिनीवर उद्योग सुरू करावयाचा त्या जमिनीचा एन. ए. (नॉन अॅग्रीकल्चर) असल्याचा दाखला तसेच जिल्हा उद्योग केंद्राकडचे रजिस्र्ट्ेशनचे प्रमाणपत्र लागते.
बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज घेताना उद्योगाचे रजिस्ट्रेशन ही बाब अतिशय महत्त्वाची असते. या संदर्भातील इतर महत्त्वपूर्ण बाबींसाठी व माहितीसाठी पुढील कार्यालयाशी संपर्क साधावा.
उद्योगधंद्याच्या नोंदणीसाठी
जिल्हा उद्योग केंद्रात लघु उद्योगाची नोंदणी केली जाते.
यंत्रसामग्रीसाठी : लघुउद्योग सेवा संस्था साकीनाका कुर्ला, अंधेरी रोड, मुंबई- ७० यांच्याकडे वेगवेगळ्या यंत्रसामग्रीची उपकरणांची माहिती मिळते.
तांत्रिक माहितीसाठी : लघुउद्योग सेवा संस्था साकीनाका कुर्ला, अंधेरी रोड, मुंबई- ७० यांच्याकडे वेगवेगळ्या यंत्रसामग्रीचे व उपकरणांची माहिती मिळते.
वित्तीय सहाय्यासाठी : महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, न्यू एक्सेलियर बिल्डिंग, फोर्ट, मुंबई-१ यांच्याकडे स्थिर स्वरूपाचे म्हणजेच यंत्रसामग्री, इमारत, जमीन इ. साठी दीर्घ मुदतीचे कर्ज मिळू शकते. याच ऑफिसची शाखा (ब्रँच) प्रत्येक जिल्ह्य़ाच्या गावी असते. तसेच सर्व राष्ट्रीयीकृत बँकांकडून खेळत्या भांडवलासाठी पुरवठा होऊ शकतो.
जागा किंवा शेडसाठी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मंगळ इंडस्ट्रियल इस्टेट एरिया, महाकाली केव्हज रोड, अंधेरी, मुंबई- ५३.
यांच्यामार्फत औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या आहेत. त्यांच्यामार्फत प्लांट किंवा तयार गाळे काही अटींवर उद्योजकांना देण्यात येतात.
कच्च्या मालासाठी : उद्योग सहसंचालक, धर्मादाय आयुक्त भवन, डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-१८ यांच्यामार्फत मुंबईतल्या उद्योजकांसाठी.
विक्री व्यवस्थेसाठी : उद्योग सहसंचालक,
सेंट्रल स्टोअर्स, परचेस ऑर्गनायझेशन, न्यू अॅडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग, मंत्रालयासमोर, मुंबई-३२ यांच्यामार्फत लघू उद्योजकांच्या उत्पादनांची खरेदी केली जाते.
कोणाकडून कोणती परवानगी घ्यावी?
० उद्योगधंद्याच्या नोंदणीसाठी - ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका.
० बिस्किट, शीतपेय, औषधे, सौंदर्य प्रसाधने, इत्यादीसाठी - कमिशनर ऑफ फ्रूट अॅण्ड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१.
० बेकरी, भाजके पोहे व गिरणीसाठी - जिल्हा अन्नधान्य पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे.
० यंत्रसामग्रीसाठी - टेक्सटाईल कमिशन, न्यू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बिल्डिंग, न्यू मरीन लाईन, मुंबई-२०.
० स्फोटक वस्तूंचे उत्पादन - चीफ कंट्रोलर ऑफ एक्सल्यूझिव्ह, ओल्ड हायकोर्ट बिल्डिंग, नागपूर- ४४० ००१.
० सॉ मिलसाठी - विभागीय वन अधिकारी
० रेडिओ, ट्रान्झिस्टर बनविण्यासाठी बिनतारी संदेश व तार खाते निरीक्षक
० छापखान्यासाठी - जिल्हाधिकारी
० वीज पुरवठय़ासाठी - महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ
० कंपनीच्या रजिस्ट्रेशनसाठी - रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, १००, नेताजी सुभाषचंद्र रोड, मुंबई-२.
० फॅक्टरीच्या रजिस्ट्रेशनसाठी - चीफ इन्स्पेक्टर ऑफ फॅक्टरीज, महाराष्ट्र शासन, एयर कंडिशन मार्केट, ताडदेव, मुंबई- ३४.
० पेटंट नोंदणीसाठी - रजिस्ट्रार ऑफ पेटंट्स, पेंटट ऑफिस, २१४, सक्र्युलर रोड, कलकत्ता-१७.
० ट्रेडमार्क नोंदणीसाठी - रजिस्ट्रार ऑफ ट्रेडमार्कस, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑफिसेस, महर्षी कर्वे रोड, मुंबई-२०.
० गुणमुद्रा नोंदणीसाठी - इंडस्ट्रियल रिसर्च लॅबोरेटरी, सायन चुना भट्टी रोड, मुंबई- ७०.
मला तर जिंकत असतांना हरनार्यांची आणि वेळेआधी मरणाऱ्याची अश्या लोकांची नेहमीच चीड वाटते .
अश्याच जिंकत असतांना हरणाऱ्या आणि वेळेआधी मरणाऱ्या लोकांसाठी मला काहीतरी वेगळ करायचं आहे परंतु माझी सुरवात या ब्लोग्मधून लिखाणाने झाली . भरपूर शिकून पुस्तकाला रद्दी समजणार्यांना सांगायचं आहे कि तुम्ही वाचलेले पुस्तके वाया गेली नाही फक्त त्याद्वारे मिळवलेल्यान्यानाचा उपयोग करण्याची वेळ आली नाही , नोकरी मिळाली नाही म्हणून काय निराश व्हायचे नोकरीतून काय पैसाच कमवणार ना तर पैसा कमविण्यासाठी गरज आहे प्रामाणिक मेहनतिची मग त्यासाठी उद्योग धंदा करा तुम्हाला जन्माला घातलेल्या तुमच्या आई वडिलांना तुमचा गर्व वाटावा अस काही करा , तुमचा माणसाचा जन्म असाच वाया घालवण्यापेक्षा त्याच काहीतरी चीज करा . अशाच खूप शिकूनही निराशा पदरी पडलेल्यांसाठी , तसेच उद्योग करायचा आहे पण मार्गदर्शना अभावी मनात नुनागंड असल्याने मागे राहिलेल्या साठी तसेच नशिबाला दोष देत बसत आपल आयुष्य वाया घाल्वानार्यासाठी मी घेऊन आलो आहे उद्योगाविषयी माहिती ,यात मिळवलेली माहिती मी आपल्यासमोर ठेवणार आहे हि माहिती माझी स्वताची लिखित नसून माझ्यासारख्याच इतरही सुज्ञ लोकांनी , उद्योगाविषयी प्रेम असणार्र्यानी लिहिलेली माहिती मी माझ्या ब्लोग मधून प्रसिद्ध करणार आहे, मला याप्रकरणी बर्याच जनांनी लिहलेली माहिती मिळाली परंतु ती कुठेच पूर्ण नाही परंतु दितैल आहे ज्यांच्या माहितीचा मी वापर करणार आहे त्या लोकांचा मी अप्रतेक्ष्पाने आभार मानतो .तर मग बनायचं न उद्योग पती तर वाचा मग माझा हा ब्लोग उद्योग्मित्र
उद्योगासाठी केवळ चर्चा करून उपयोग नाही तर गरज आहे ती आत्मपरीक्षण, चिंतन, कृती आणि संघर्ष करण्याची. सुप्त सृजनशीलतेचा वापर करून स्वत:तील गुण, दोष ओळखून, अचूक गुणांचा वापर करून उद्योगव्यवसायात यशस्वी होण्याची.
मराठी माणूस उद्योगात मागे आहे, एवढीच चर्चा करून मराठी माणूस उद्योग सुरू करणार आहे का? उद्योगासाठी केवळ चर्चा करून उपयोग नाही तर गरज आहे ती आत्मपरीक्षण, चिंतन, कृती आणि संघर्ष करण्याची. सुप्त सृजनशीलतेचा वापर करून स्वत:तील गुण, दोष ओळखून, अचूक गुणांचा वापर करून उद्योगव्यवसायात यशस्वी होण्याची. उद्योग करण्यासाठी सकारात्मक विचारसरणी खूप गरजेची आहे. जसे आपले विचार, तसे आपले आचार आणि हे विचार आणि आचारच आपलं भविष्य ठरवत असतात. आपण जी काही कल्पना करतो, त्यावर आपलं मन विश्वास ठेवते व तेच प्रत्यक्षात साकार होते त्यामुळे विचारांचं सामथ्र्य खूप मोठं आहे. सकारात्मक विचार, सकारात्मक वृत्ती, सकारात्मक कृती, उद्योगातील यशासाठी आवश्यक आहे. जो उद्योग आपण करणार आहोत त्याची योग्य ती तंत्रं आणि कौशल्यं आत्मसात करणे गरजेचे आहे.
उद्योगातच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक व्यवहारात निर्णयाला खूप महत्त्व आहे. निर्णय घेताना चौफेर विचार होणे गरजेचे आहे. उद्योग करताना नावीन्याचा ध्यास घेणे खूप आवश्यक आहे.उद्योगात मोठी स्वप्ने पाहणे गरजेचे आहे. पण नुसती स्वप्ने रंगवत बसता ठराविक काळात ही स्वप्ने कशी अमलात येतील, कशी प्रत्यक्षात येतील याचा उद्योजकाला ध्यास असणे आवश्यक आहे. नवनवीन आव्हाने सतत स्वीकारणे, झगडून त्यातून यश मिळविणे हा गुण उद्योजकात असणे आवश्यक आहे.